संभाजी महाराजांच आयुष्य लहान असल तरी खूप पराक्रमी होत. संभाजी राजांच्या काळात मराठी आरमारात
५० युद्धनौका व १२० गलबत होती,ज्याचा प्रामुख्याने सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी उपयोग होई.पोर्तुगीज व
ब्रिटीशानादेखील मराठा आरमाराची प्रचंड दहशत होती
जुलै १६८१ राजांचा सिद्दीशी खांदेरी व उंदेरी वरून संघर्ष झाला,परंतु हाती यश आले नाही.सिद्धीच्या किनारी प्रदेशात महाराजांनी प्रचंड जाळपोळ केली आणि या पराभवाचा बदला घेतला.
ज्या जंजीऱ्याने थोरल्या महाराजांना हुलकावणी दिली होती त्यावर संभाजी राजांनी सन १६८२ साली
हल्ला चढवला पण जंजिरा एक मजबूत दुर्ग असल्याकारणाने त्यावर विजय मिळवणे कठीण होते.तरीही राजांनी पराक्रमाची शर्थ केली,परंतु ऐनवेळी मुघलांनी स्वराज्यावर स्वारी केल्यामुळे राजांना ती मोहीम अर्ध्यावरच सोडावी लागली.
राजांनी पोर्तुगीजांना पळता भुई थोडी केली होती.राजांनी चेऊलवर हल्ला चढवला,याची परिणीती
फोंडा व गोव्यावर हल्ल्यात झाली व युद्धात पोर्तुगीजांची प्रचंड हानी झाली.संभाजी राजांनी कारंजा व st.एस्तेवास वर कब्जा मिळविला.परंतु या मोहिमेविषयी अधिक माहिती मिळत नाही
पोर्तुगीजांना प्रचंड दहशत बसल्यामुळे त्यांनी भविष्यात स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पहिले नाही.सन १९८४ मध्ये झालेल्या तहामुळे राजांनी सागरावर सुद्धा मराठयांच वर्चस्व निर्माण केल.
संभाजी राजांच्या वधाबरोबर मराठा आरमाराचा प्रारंभीचा इतिहास संपतो.जेव्हा मुघलानी राजापुरवर हल्ला केला,तेव्हा राजारामांचा परिवार समुद्रमार्गे जिंजीस जाऊन त्यांना मिळाला.
संदर्भ: A History of the Maratha Nevy and
Merchantship
History of Maratha's ,Grant Duff
© अमोल शिवाजी रोकडे
No comments:
Post a Comment