Friday, 2 December 2016

मराठा आरमार...भाग १

संभाजी महाराजांच आयुष्य लहान असल तरी खूप पराक्रमी होत. संभाजी राजांच्या काळात मराठी आरमारात
५० युद्धनौका व १२० गलबत होती,ज्याचा प्रामुख्याने सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी उपयोग होई.पोर्तुगीज व
ब्रिटीशानादेखील मराठा आरमाराची प्रचंड दहशत होती
जुलै १६८१ राजांचा सिद्दीशी खांदेरी व उंदेरी वरून संघर्ष झाला,परंतु हाती यश आले नाही.सिद्धीच्या किनारी प्रदेशात महाराजांनी प्रचंड जाळपोळ केली आणि या पराभवाचा बदला घेतला.

ज्या जंजीऱ्याने थोरल्या महाराजांना हुलकावणी दिली होती त्यावर संभाजी राजांनी सन १६८२ साली
हल्ला चढवला पण जंजिरा एक मजबूत दुर्ग असल्याकारणाने त्यावर विजय मिळवणे कठीण होते.तरीही राजांनी पराक्रमाची शर्थ केली,परंतु ऐनवेळी मुघलांनी स्वराज्यावर स्वारी केल्यामुळे राजांना ती मोहीम अर्ध्यावरच सोडावी लागली.

राजांनी पोर्तुगीजांना पळता भुई थोडी केली होती.राजांनी चेऊलवर  हल्ला चढवला,याची परिणीती
फोंडा व गोव्यावर हल्ल्यात झाली व युद्धात पोर्तुगीजांची प्रचंड हानी झाली.संभाजी राजांनी कारंजा व st.एस्तेवास वर कब्जा मिळविला.परंतु या मोहिमेविषयी अधिक माहिती मिळत नाही

पोर्तुगीजांना प्रचंड दहशत बसल्यामुळे त्यांनी भविष्यात स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पहिले नाही.सन १९८४  मध्ये झालेल्या तहामुळे राजांनी सागरावर सुद्धा मराठयांच वर्चस्व निर्माण केल.

संभाजी राजांच्या वधाबरोबर मराठा आरमाराचा प्रारंभीचा इतिहास संपतो.जेव्हा मुघलानी राजापुरवर हल्ला केला,तेव्हा राजारामांचा परिवार समुद्रमार्गे जिंजीस जाऊन त्यांना मिळाला.

संदर्भ: A History of the Maratha Nevy and
          Merchantship

         History of Maratha's ,Grant Duff

                  © अमोल शिवाजी रोकडे

वाचा आमचा नवीन लेख : ध्येय...

ध्येय




               ध्येयाचा पाठलाग करताना असे वातावरण तयार होते कि प्रत्येक गोष्टीत आपल्याला ध्येयच दिसते.बाकीच्या साऱ्या गोष्टी मागे पडतात,तुच्छ वाटतात.सतत तोच विचार,तेच सतत ध्येय,बाकी कोणता विचार मनाला शिवत नाही.अशा भारावलेल्या परिस्थितीत समोरील प्रत्येक वस्तू ध्येयापर्यंत पोहोचविण्याची प्रेरणा देत आहे असे वाटते.निराशेचे ढग कधी मनपटलावर येत नाही आणि आले तरी ते धुके ध्येयाच्या प्रेरणेने निघून जाते. मंतरलेले दिवस असतात ते, आपण केवळ आपल्या धेयाचाच विचार करत असतो,तहानभूक विसरून.आपल्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टींच भान नसत,इतके डुंबून गेलेलो असतो आपण ध्येयाच्या विचारात जशी कि योग्याची समाधी अवस्था.घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्याला धेयाजवळ पोहोचत असतो,वेध लागलेलं असत केवळ ध्येय 
गाठण्याच.जेव्हा अशी अवस्था लाभते,तेव्हा वाईट घडणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्रेरणा देतात,अस भासत.अशी असते ध्येयवेड्या मनुष्याची अवस्था.

                असा  मनुष्य  एकदा आपल ध्येय निश्चित केल कि तो आपली शारीरिक,मानसिक व आध्यात्मिक शक्ती त्या ध्येय    प्राप्तीसाठी खर्ची करतो.त्याला नसते दुसऱ्या जगाची परवा,नसतेच क्सलीही फिकीर.त्याला नसत देणघेण इतर लोक काय म्हणत असतील,कारण तो ध्येयवेडा असतो.त्याचे सर्व विचार,शरीरातील सर्व अणुरेणु एकाच गोष्टीवर केंद्रित असतात ते म्हणजे त्याचे ध्येय.(क्रमशः)

आयुष्यात ध्येयामुळे माणसाला जगण्याची जिद्द मिळते आणि हीच जिद्द आयुष्य अजून फुलवते.


© अमोल शिवाजी रोकडे


वाचा आमचे नवीन लेख काही दिवसातच.....

वेदनांचे नाते

जेव्हा वेदनांचे नाते जुळते तेव्हा माणसामाणसातील भिंती
अन राष्ट्राराष्ट्रातील तटबंदी कोसळून पडतात
माणसांची मन एकमेकांशी जुळतात
एक अदृश्य प्रेमाचा धागा एकमेकांना गुंफतो
त्यांचात नसतो कुठलाही जातीभेद,द्वेष,राग एकमेकांविषयी
असते तर मनाचे नाते एकमेंकाशी
वाहतात त्यांचात मैत्रीचे झरे
गळून पडतात परंपरांचे,रूढीचे पुटे
तुटले जातात वर्षानुवर्षांचे पाश
होतो जेव्हा असा समाज निर्माण
धावते ते राष्ट्र वेगात प्रगतीपथावर
कारण कारण माणूस बांधलेलाअसतो
दुसऱ्या माणसाशी प्रेमाच्या नात्याने,वेदनेच्या नात्याने
उठ्तात ते एकमेकांचे हात धरून
देतात ते साथ एकमेकांना
देतात ते  लढा परंपरांशी,रुढींशी
ज्यांनी ठेवल आहे त्यांना अज्ञानाच्या काळोखात
झगडतात ते आपल्या हक्कांसाठी,न्याय्य मागण्यासाठी
असते नाते त्यांच्यात वेदनेचे
फुंकर घालतात टे एकमेकांच्या वेदनेवर
अन पाहतात टे सोनेरी पहतेची स्वप्ने
नक्कीच उजाडतो असा सोनेरी दिवस
गळालेले असतात सगळे बंध रूढींचे,परंपरांचे
निर्माण होतो असा समाज ज्यात
नसते द्वेषाची भावना
कारण त्यांचात असते नाते वेदनेचे
© अमोल रोकडे


फेसबुकवर फॉलो करा

ट्वीटरवर फॉलो करा

Thursday, 1 December 2016

दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील

दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील
दुःखाच्या माळेतील दोन मणी तरी गळून पडतील
दोन दिवस सुखाचे तरी पाहायला भेटतील
दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील


तुटलेल्या  भग्न अवशेषावरून पाय काही पाऊले तरी चालतील
मुखावर हास्याचे भाव तरी फुलतील
हृदयाच्या पटलावर सुखाचे काही सूर तरी उमटतील
दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील


शरीरात सुखाची काही कंपने तरी होतील
कानात आनंदाचे दोन शब्द तरी घुमतील
भळभळनाऱ्या जखमेतील वेदना तरी कमी होतील
दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील


सुखाचे हे क्षण पायाचे चालण्याचे त्राण तरी देतील
दोन क्षण सुखाचे अंगात दहा हत्तींचे बळ तरी देतील
दोन क्षण सुखाचे उद्याच भविष्य निर्माण करतील
दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील
-अमोल रोकडे

मायभूमी

नांदते येथेचि शांती
हि आहे महाराष्ट्र भूमी
आहे हि स्वर्गाहुनी सुंदर
अशी हि सुंदर माझी मायभूमी

वस्ती आहे येथे संताची,महात्म्यांची
तशीच आहे जिजाऊची,छत्रपतींची
नांदत आहे जेथे संस्कृती
अशी हि सुंदर माझी मायभूमी

राकट आहे उभा माझा सह्याद्री
असेच आहे सुंदर माझे कोकण
नटलेल्या नववधूसारखा
अशी हि सुंदर माझी मायभूमी

घुमले सह्याद्रीत शिवबाच्या पराक्रमाचे पोवाडे
पावन झाला हा सह्याद्री मावळ्यांच्या रक्ताने
वीरांची आहे हि भूमी
अशी हि सुंदर माझी मायभूमी


लाभला वसा तिला अध्यात्माचा
वसा तोच खांद्यावरी वाहतात वारकरी 
आहे जिथे विठूरायाची वस्ती
अशी हि सुंदर माझी मायभूमी

वाहतात नद्या तिच्या अंगावरी
कृष्णा,चंद्रभागा,गोदावरी
करताहेत तिचा जलाभिषेक
अशी हि सुंदर माझी मायभूमी

आहे हि भूमी शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची
फुलविले तिला त्यांनी कष्टांनी
आहे ती म्हणूनच मोत्यांची खाण
अशी हि सुंदर माझी मायभूमी

नांदतात जिथे लोक सौहार्दाने
वाहतो पुरोगामी विचारांचा जिथे झरा
म्हणुनी आहे ती पावनगंगा
अशी हि सुंदर माझी मायभूमी



अमोल शिवाजी रोकडे

                                                                      © अमोल शिवाजी रोकडे

Follow me on facebook