Thursday, 1 December 2016

मायभूमी

नांदते येथेचि शांती
हि आहे महाराष्ट्र भूमी
आहे हि स्वर्गाहुनी सुंदर
अशी हि सुंदर माझी मायभूमी

वस्ती आहे येथे संताची,महात्म्यांची
तशीच आहे जिजाऊची,छत्रपतींची
नांदत आहे जेथे संस्कृती
अशी हि सुंदर माझी मायभूमी

राकट आहे उभा माझा सह्याद्री
असेच आहे सुंदर माझे कोकण
नटलेल्या नववधूसारखा
अशी हि सुंदर माझी मायभूमी

घुमले सह्याद्रीत शिवबाच्या पराक्रमाचे पोवाडे
पावन झाला हा सह्याद्री मावळ्यांच्या रक्ताने
वीरांची आहे हि भूमी
अशी हि सुंदर माझी मायभूमी


लाभला वसा तिला अध्यात्माचा
वसा तोच खांद्यावरी वाहतात वारकरी 
आहे जिथे विठूरायाची वस्ती
अशी हि सुंदर माझी मायभूमी

वाहतात नद्या तिच्या अंगावरी
कृष्णा,चंद्रभागा,गोदावरी
करताहेत तिचा जलाभिषेक
अशी हि सुंदर माझी मायभूमी

आहे हि भूमी शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची
फुलविले तिला त्यांनी कष्टांनी
आहे ती म्हणूनच मोत्यांची खाण
अशी हि सुंदर माझी मायभूमी

नांदतात जिथे लोक सौहार्दाने
वाहतो पुरोगामी विचारांचा जिथे झरा
म्हणुनी आहे ती पावनगंगा
अशी हि सुंदर माझी मायभूमी



अमोल शिवाजी रोकडे

                                                                      © अमोल शिवाजी रोकडे

Follow me on facebook

1 comment: