Pages

Friday, 2 December 2016

वाचा आमचा नवीन लेख : ध्येय...

ध्येय




               ध्येयाचा पाठलाग करताना असे वातावरण तयार होते कि प्रत्येक गोष्टीत आपल्याला ध्येयच दिसते.बाकीच्या साऱ्या गोष्टी मागे पडतात,तुच्छ वाटतात.सतत तोच विचार,तेच सतत ध्येय,बाकी कोणता विचार मनाला शिवत नाही.अशा भारावलेल्या परिस्थितीत समोरील प्रत्येक वस्तू ध्येयापर्यंत पोहोचविण्याची प्रेरणा देत आहे असे वाटते.निराशेचे ढग कधी मनपटलावर येत नाही आणि आले तरी ते धुके ध्येयाच्या प्रेरणेने निघून जाते. मंतरलेले दिवस असतात ते, आपण केवळ आपल्या धेयाचाच विचार करत असतो,तहानभूक विसरून.आपल्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टींच भान नसत,इतके डुंबून गेलेलो असतो आपण ध्येयाच्या विचारात जशी कि योग्याची समाधी अवस्था.घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्याला धेयाजवळ पोहोचत असतो,वेध लागलेलं असत केवळ ध्येय 
गाठण्याच.जेव्हा अशी अवस्था लाभते,तेव्हा वाईट घडणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्रेरणा देतात,अस भासत.अशी असते ध्येयवेड्या मनुष्याची अवस्था.

                असा  मनुष्य  एकदा आपल ध्येय निश्चित केल कि तो आपली शारीरिक,मानसिक व आध्यात्मिक शक्ती त्या ध्येय    प्राप्तीसाठी खर्ची करतो.त्याला नसते दुसऱ्या जगाची परवा,नसतेच क्सलीही फिकीर.त्याला नसत देणघेण इतर लोक काय म्हणत असतील,कारण तो ध्येयवेडा असतो.त्याचे सर्व विचार,शरीरातील सर्व अणुरेणु एकाच गोष्टीवर केंद्रित असतात ते म्हणजे त्याचे ध्येय.(क्रमशः)

आयुष्यात ध्येयामुळे माणसाला जगण्याची जिद्द मिळते आणि हीच जिद्द आयुष्य अजून फुलवते.


© अमोल शिवाजी रोकडे


वाचा आमचे नवीन लेख काही दिवसातच.....

No comments:

Post a Comment