Pages

Thursday, 1 December 2016

दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील

दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील
दुःखाच्या माळेतील दोन मणी तरी गळून पडतील
दोन दिवस सुखाचे तरी पाहायला भेटतील
दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील


तुटलेल्या  भग्न अवशेषावरून पाय काही पाऊले तरी चालतील
मुखावर हास्याचे भाव तरी फुलतील
हृदयाच्या पटलावर सुखाचे काही सूर तरी उमटतील
दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील


शरीरात सुखाची काही कंपने तरी होतील
कानात आनंदाचे दोन शब्द तरी घुमतील
भळभळनाऱ्या जखमेतील वेदना तरी कमी होतील
दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील


सुखाचे हे क्षण पायाचे चालण्याचे त्राण तरी देतील
दोन क्षण सुखाचे अंगात दहा हत्तींचे बळ तरी देतील
दोन क्षण सुखाचे उद्याच भविष्य निर्माण करतील
दोन क्षण सुखाचे भेटले तरी चालतील
-अमोल रोकडे

No comments:

Post a Comment